वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलिस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाध नागदेवे
वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पोलीस भरती प्रक्रिया सुरु असुन आज दिनांक २०.०२.२०२६ रोजी शारीरीक चाथणी करिता एकूण ७०० महिला उमेदवार बोलविण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात एकुण ५८२ महिला उमेदवार आज रोजी हजर आले. त्यापैकी शारीरीक मोजमापात अपात्र महिला उमेदवार ४४ व मैदानी चाचणीत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवार एकुण २११ तसेच मैदाणी चाचणीत पात्र ठरलेले उमेदवार एकुण ३२७ असे आहेत.
तसेच दररोज पोलीस भरती करिता येणाऱ्या महिला उमेदवारांना मैदानाजवळच नाश्ता, झेरॉक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था, वेद्यकीय सुविधा, अॅम्बुलंस, ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुदधा सोय करण्यात आली आहे.
तरी सर्व नागरीकांना व पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, जर कोणी आपणास पैशाची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये लावुन देण्याचे आमिष देत असल्यास अशा आमिषाला व भूलथापांना बळी पडु नये. संपुर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया ही निःपक्षपाती व पारदर्शक असुन संपुर्ण मैदान परिसरात cctv कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेरांव्दारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे व चांगल्या वातावरणात राबविण्यात येत आहे.



