शेतकऱ्यांना मिळत आहे सघन पिक लागवड प्रणाली मध्ये वाढीव उत्पन्न : डॉ. जीवन कतोरे
खरांगणा येथे सघन कपाशी लागवड प्रक्षेत्र दिन साजरा व कापूस कुट्टी यंत्र प्रात्यक्षिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा जिल्हातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा द्वारे कपाशी पिकावरील विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूर द्वारे संचालित कपाशीसाठी सघन लागवड प्रणाली अंतर्गत सन २०२५ -२६ दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील तालुका आर्वी येथील मोरांगना गावामध्ये प्रगतीशील शेतकरी श्री. पंकज झाडे यांचे शेतावर प्रक्षेत्र दिवस व प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन व कापूस कुट्टी यंत्र प्रात्यक्षिक घेण्यात आले.
सदर कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या अध्यक्षते खाली आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी (आर्वी) श्री. विजय खोंडे, वेलस्पन फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री. दीपक खांडे, कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे, पिक संरक्षण विषयतज्ञ डॉ. निलेश वझिरे, कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार, उप कृषि अधिकारी सौ. संजीविनी काळबांडे, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. आर. पी. राउत यांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी पारंपारिक शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देऊन लागवड प्रणाली मध्ये सुधारणा करून कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले. तसेच हलकी लालसर जमीन व मध्यम जमिनी साठी सघन लागवड पद्धत हि सर्वोत्तम ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतांना शास्त्रोक्त पद्धतीचे पालन करावे असे मार्गदर्शन मंडळ कृषि अधिकारी श्री. विजय खोंडे यांनी केले तसेच मृदा संवर्धन ही काळाची गरज असून जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर दिला. तसेच रासायनिक खतांचा अतीवापर न करता जैविक खतांचा वापरा करावा व कृषि विभागा मार्फत राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले. वर्धा जिल्ह्यामध्ये सघन कपाशी लागवड पद्धती मुळे शेतकऱ्यांना मिळणारे अधिक उत्पन्न यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कापूस कुट्टी यंत्राचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे असे श्री. दीपक खांडे यांनी सांगितले. कोरडवाहू कपाशी मध्ये झाडांची संख्या वाढविली तर उत्पन्न जास्त येईल व कपाशीची अतिरिक्त होणारी वाढ थांबविल्यास जास्त बोंडे येऊन उत्पन्नात वाढ होते असे मार्गदर्शन कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. रुपेश झाडोदे यांनी केले. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी पिबी नॉट तंत्रज्ञान तसेच कीड व बुरशीजण्य रोग व्यवस्थापन करिता ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी, निंबोळी अर्क, व इतर जैविक कीटकनाशकांचा वापर केल्याने काय फायदा होतो या विषयी पिक संरक्षण विषयतज्ञ डॉ.निलेश वझिरे यांनी मार्गदर्शन केले. कापूस पिकाचे उर्वरीत अवशेषांची कुट्टी करून ते जमिनीत पुरविल्यास जमिनी ची सुपीकता वाढविण्यास मदत होते असे कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. सविता पवार यांनी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले व श्री पंकज झाडे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटी दरम्यान कापूस कुट्टी यंत्रा चे शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी कपाशी पिकाचे निरीक्षण करण्यात केले व कापूस कुट्टी यंत्र प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखवीण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता पवार व आभार डॉ. रुपेश झाडोदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारीता डॉ. अंकिता अंगाईतकर, श्री. किशोर उगलमूगले, कू. ऋतुजा कोरडे, श्री. गणेश वायरे , श्री गजेंद्र मानकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



