ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहराला पाणी टंचाई पासून वाचविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना व शुद्ध जल, सुदृढ शहर योजना राबविण्यात यावी 

नगरसेविका दिशा खांडेभराड यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहराला भविष्यातील पाणी टंचाईपासून वाचवण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ धोरण राबविण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण मागणी नगरसेविका दिशा खांडेभराड यांनी नगर परिषदेच्या अध्यक्ष माधुरी शिपणे व उपाध्यक्ष वनिता भुतडा यांना निवेदन देऊन केली आहे त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या: मध्ये शासकीय इमारतींचे वॉटर ऑडिट करण्यात यावे,नगर परिषद, शाळा, दवाखाने येथे तातडीने रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावावी,मालमत्ता करात ५% सवलत देण्यात यावी,खाजगी घरांमध्ये ही यंत्रणा बसवणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून टॅक्समध्ये सवलत देण्यात यावी,विहीर व कूपनलिका पुनर्भरण: पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष प्रकल्प राबवावे, स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी,’माझी वसुंधरा’ किंवा १५ व्या वित्त आयोगातून या कामांसाठी निधी उपलब्ध करावा ,शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उचललेले हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे दिशा किशोर खांडेभराड (नगरसेविका, नगर परिषद देऊळगाव राजा) यांनी म्हटले आहे. तसेच शहराचा पाणी पुरवठा सुव्यवस्थित करण्याबाबत विविध प्रकारच्या मागण्या केल्या आहेत, त्यात पाणी वितरण व्यवस्था चे ऑडिट करणे, फिल्टर प्लांट ची क्षमता तपासणे आणि नियमित टी सी एल व क्लोरिन प्रक्रिया करणे, पाणी प्रश्नांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्प लाईन सुरू करणे, हायड्रॉलिक तंत्रज्ञान चा वापर करून शेवटच्या घरापर्यंत समान पाणी पोहोचवने, अल्ट्रासोनिक फ्लो मीटर चा वापर करून वाया जाणारे पाणी वाचवावे, जुन्या मोटर्स बदलविणे, त्यामुळे वीज बिल कमी होईल या मागण्या नगरसेविका दिशा खांडेभराड यांनी निवेदनात केल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये