कवी रमेश नरोडे यांच्या भावनांच्या लाटा कविता संग्रहाचे 22 फेब्रुवारी रोजी प्रकाशन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
“देऊळगाव राजा येथील एक कवी रमेश जी नरोडे सर यांच्या “भावनांच्या लाटा “या कविता संग्रहाच्या कवितेचे रसग्रहण करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न” दिनांक 22 फेब्रुवारीला या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे,
अभ्यासू हळव्या मनाचे परंतु मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे आपल्या भावनांच्या लाटा या कवितासंग्रहाच्या माध्यमातून विविध अंगी दर्शन घडवणारे कवी रमेशजी नरोडे हे एक छुपे रुस्तुम कवी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये, आपल्या वागण्या बोलण्यातून व काव्यात्मक बोलण्यातून कुठेही भाषण देत असताना कवितेची किंवा एखाद्या गजलेची मधूनच फेक करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे एक कवीआहेत, ज्याप्रमाणे पाऊस पडत असताना अचानक एखादी वीज चमकून जाते व त्या लखलखाटाने बघणारा चे डोळे दिपून जातात तसेच सरांच्या भाषणामध्ये येणारी अचानक एखाद्या कवितेची किंवा गजलेची ओळ अचूकपणे चपखलपणे समोरच्या श्रोत्यावर फेकली जाते तेव्हा आकाशला त्या विद्युलेतीचा भास होऊन वक्ता हा कवी मनाचा असल्याचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो साधी राहणी व भावनात्मक आचार विचार सदैव हास्यमुख आणि काव्यात्मक आवरण असलेले विचार यावरून या व्यक्तिमध्ये कुठेतरी खोलवर एक सृजनशील कवी असल्याचा साक्षात्कार समोरच्या व्यक्तीला होत असतो वास्तविक कविता म्हणजे माझ्या मते कवितेतील क म्हणजे करुणा वि म्हणजे विविधता आणि ता म्हणजे तारतम्य या तिन्ही गोष्टीचा संगम ज्यामध्ये असतो त्याला आपण कविता म्हणतो मुळातच मराठीची व साहित्याची आवड असणारे श्री नरोडे सर अनावधान्याने विद्या विज्ञानाचे पदवीधर झाले परंतु आत खोलवर दडलेला साहित्यिक कधीही बाहेर उसळी घेईल हे ठरलेलेच होते आणि त्याप्रमाणे 1985 पासून या कवी मनाच्या कवीने हळूहळू मनामध्ये उठणाऱ्या भावनांचे तरंग शब्दांमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला व तो हळूहळू आकार घेऊ लागला त्यानंतर संसारिक जबाबदाऱ्या व कामाच्या व्यापामध्ये ह्या भावनाकडे थोडे दुर्लक्ष झाले पण जर आपण एखाद्या समुद्रकिनारी उभा राहिलो तेव्हा आपल्या लक्षात येते की क्षणाक्षणाला समुद्राच्या लहान मोठ्या लाटांचा उचंबळणाऱ्या लाटांचा मारा किनाऱ्यावरच्या किनाऱ्यावर होत असतो त्याचप्रमाणे एक दडलेला कवी व त्या भावनांचा तरंग नरोडे सरांच्या हृदयामध्ये उचंबळत राहिला आणि थोडी उसंत मिळतात त्या भावना त्या लाटा शब्दांचे रूप घेऊ लागल्या आणि काही प्रेरणा घेऊन किंवा उसंत काढून हे भावनेचे तरंग शब्दरूप झाले आणि भावनांच्या लाटा ह्या शब्दरूप झाल्या या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर असून भव्य निळ्या आकाशामध्ये सोनेरी तांबडा रूप घेतलेले भगवान सूर्यनारायण तळपत असताना समुद्राच्या उसळणाऱ्या उचंबळणाऱ्या छोट्या मोठ्या लाटा ह्या किनाऱ्यावर आदळत आहेत व पुन्हा परत सागरामध्ये विलीन होत आहे अशा प्रकारचे विहंगम दृश्य या मुखपृष्ठावर असून श्री नरोडे सरांच्या हृदयामध्ये उठणारे भावनांचे तरंग हे गेल्या 40 वर्षापासून त्यांच्या हृदय रुपी किनाऱ्यावर येऊन आदळत होते व त्यानंतर आपल्या ज्ञानदानाच्या कर्तव्यातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर ह्या लाटांनी भव्य रूप घेतले व समुद्रकिनाऱ्यावरून त्यांनी उचंबळून येऊन शब्दांचे रूप घेतले व त्यातून भावनांच्या लाटा हा कवितासंग्रह आकारास आला या कवितासंग्रहाला देऊळगाव राजा येथील एक साहित्यिक व श्री नरोडे सरांचे सहपाठी श्री गोविंद जी बोरकर यांनी सुंदर प्रस्तावना दिली असून कवितेमधील ठळक भावनांचा उल्लेख आपल्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे श्री गोविंद बोरकर यांची एक कादंबरी प्रकाशित झाली असून साहित्य विश्वात रमणारे ते एक हूरहूननरी व सदैव क्रियाशील असणारे व्यक्तिमत्व आहे, वास्तविक विज्ञानासारख्या रुक्ष प्रांतामध्ये एखाद्या कवितेची झुळूक निर्माण होणारे हे वाळवंटातील मरूस्थळासारखे असून श्री नरोडे सरांच्या कविता ह्या त्याच एक परिपाक आहे या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर असे वाटले की आपण सुद्धा या कवितासंग्रहाचे चिंतन मनन केले पाहिजे आणि सर्वप्रथम मृगाचा पाऊस ही कविता वाचून मन ओथंबून गेले ज्याप्रमाणे मृगाच्या पहिल्या पावसाने या धरती माती मधून एक सुगंध दरवळतो त्याप्रमाणे या कवितासंग्रहाचा सुगंध व त्या भावना माझ्या मनात तरंगून गेल्या हा कवितासंग्रह म्हणजे मानवी जीवनाच्या तीन पिढ्यांचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक भावनिक राजकीय नैसर्गिक चाली रीती परंपरा व मानवाचे बदलणारे रंग तसेच प्रत्येक पिढीमध्ये होत चाललेला बदल याचे अचूक विश्लेषण कवींनी या कवितेच्या माध्यमातून केलेले आहे ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा ह्या वारंवार किनाऱ्याला धडक देत असतात त्याप्रमाणे एक एक कविता वाचत असताना त्या कवितेचे रसग्रहण केले असताना व त्यातील भावार्थ समजून घेत असताना आपल्या काळीजरूपी किनाऱ्यावर या लाटांचे तरंग उठल्या शिवाय राहत नाही आजच्या तरुण पिढीच अचूक व योग्य निरीक्षण व परीक्षक परीक्षण कवीने केले असून ढासळत्या नीतिमत्त वर त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे ती खंत व्यक्त करताना तरुण पिढीला पुढील वाटचालीसाठी व मानवाला निसर्गरुप अनुरूप जीवन जगण्याचा आवाहनही ते आपल्या विविध कविता मधून करत असता त्यांनी मृगाच्या पावसाने तृप्त झालेली धरणीमाता आपल्या शेतकरी राजाला खुणावत असून बळीराजाची धांदल योग्य शब्दात चित्रित केली आहे त्याचबरोबर परमेश्वराच्या लीलांच वर्णन करताना त्यांनी त्यांना गारुड्याची व जादूगाराची उपमा दिली असून मानवाला कशाप्रकारे संसार रुपी जंजाळामध्ये ईश्वर फिरवतो याचे वर्णन केले असून पुढच्या जन्मामध्ये झालेल्या चुका क्षमा करून मानवी जीवनात सुख निर्माण करण्याचे प्रार्थना त्यांनी केली आहे भावनांच्या लाटा या कवितेत कल्पना या जीवनाचा आधार असून असून भावनांच्या लाटा ह्या वेड्यासारख्या उसळत असतात पण त्यांना योग्य रस्ता मिळत नाही अशी खंत व्यक्त केली आहे परंतु नंतर मानव हा आशेच्या किरणावर जगत असतो असे त्यांनी नमूद केले आहे त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वातावरण कसे शिस्तीचा आकार घेते व कोणताही नट्टापट्टा न करता नीट चालू लागते असे वर्णन त्यांनी केले आहे मानवाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही आचार विचाराची संहिता घालून घेतल्यास मानवी जीवन सुखी व समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर त्यांनी भगवान सूर्यनारायण हे आकाशात तळपत असताना घामाचेलोट कसे निघतात याचे वर्णन करताना ठिबकस सिचन व आंब्याच्या रसाची उपमा दिली असून सुंदर उपमा अलंकाराचा उपयोग त्यांनी केलेला आहे बेडूक ज्याप्रमाणे ओलावा शोधतो थंडगार मिळणाऱ्या पेयाचे शोध घेतो आहे त्यानंतर पायरीच्या दगडाचे वर्णन करताना थंडी ऊन वारा पाऊस सहन करताना संत सज्जनांचे स्पर्श होताच तो पायरीचा दगड आपल्यावरील सर्व अन्याय अत्याचार विसरून जातो कारण पायरीचा दगड हा परोपकारासाठी व मानवतेसाठी लाथा खाऊन आपले मोठेपण सिद्ध करतो अशा प्रकारे सुखे असो आम्ही पायरीचे दगड ह्या उक्तीप्रमाणे अगदी कष्ट करून हालापेष्ठा सहन करतात धरतीचा प्रियकर या कवितेमधून धरती मातेने हिरवेगार रूप असे सुंदर धरल्याचे कवींनी नमूद केले आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितेप्रमाणे त्यांनी केलेले हे धरती मातेचे वर्णन व धरती मातेचा पडणारा पाऊस हा जणूकाही प्रियकर असून त्यामुळे धरती माता ही आनंदून व ओथंबून गेल्याचे निसर्गदृश्य अतिशय सुंदर पद्धतीने कवीने या कवितेतून मांडले आहे.
जुन्या पिढीला या धरती मातेचे हे सुंदर रूप अनेकदा पाहायला मिळालं परंतु अलीकडच्या काळात या सिमेंटच्या जंगलामध्ये हे धरतीच हिरव स्वप्न धुसर होत असून नवीन पिढी त्या आनंदाला मुकल्याचे दिसून येत आहे आताच्या नवीन पिढीमध्ये ढाबा संस्कृतीचा सुळसुळाट झाला असून आपल्या संस्कृतीला नवीन पिढी विसरत चालली असून ढाबा संस्कृतीत रमान झाली असून वाड वडिलांची संपत्ती विकून त्या पैशावर चंगळवादी पिढी निर्माण झाल्याची खंत कवीने व्यक्त केले आहे पार्ट्यांची संस्कृती बेजबाबदार खर्च यामुळे नवीन पिढीचा व नीतिमत्तेचा ऱ्हास होत असल्याचे चित्र कवींनी रेखाटले आहे तसेच या विज्ञान युगामध्ये विज्ञानाचा अविष्कार असलेला मोबाईल हा मानवी जीवनामध्ये सर्वव्यापी झालेला असून काम धंदा सोडून तरुण पिढी सदैव आपल्या हातात मोबाईल घेऊन आपल्या वेळेचा शक्तीचा नाश घडविता आहे तेव्हा मोबाईलचा योग्य वापर करून त्याच्या दुष्परिणाम मधून दूर राहण्याचे आव्हान कवीने केले आहे जुन्या काळामध्ये असणारा चेंडूफळीचा खेळ आता क्रिकेटच्या रूपात दिसतो आहे व खेळा खेळा मध्ये गुंतवून इंग्रजांनी आम्हाला गुलामीत ढकललेले आहे असे वर्णन कवींनी केले असून खेळाच्या बाजारीकरणावर ही त्यांनी आसूड ओढले आहेत परंतु त्याचबरोबर भारताने कपिल देवच्या नेतृत्वात विश्व कप जिंकून दिल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे त्यानंतर आजच्या बळीराजाच्या अवस्थेचे वर्णन करताना कर्जाच्या फासाने बळी राजाचे जीवन उद्ध्वस्त केल्याचे विदारक चित्रण कवीने केले आहे त्याचबरोबर पिंडदान या कवितेमधून कोरोनाची वर्णन सुद्धा केले असून कोरोनाचे विदारक चित्र मांडले आहे प्रत्येक घरामध्ये असणारे कॅलेंडर त्याचा सुंदर वर्णन केले असून कॅलेंडर हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असल्याचे नमूद केले आहे त्यानंतर पायातील वाहनांचा महत्त्व सांगताना चिखलापासून व काट्यापासून पायांना संरक्षण देणारी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी चप्पल हे सुद्धा मानवाला असे आवाहन करते की मला हातात नाही तर पायातच घाला असे आव्हान केले आहे टिकटिक या कवितेमधून वेळेचं महत्व टाईम इज मनी हे कवींनी अधोरेखित केले आहे
लेखक पत्रयोगी प्रा. विनायक राव कुळकर्णी, माजी अध्यक्ष, देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ, जिल्हा बुलढाणा



