शोभेचा बनला प्रवाशी निवारा; प्रवाशांना पिंपळवृक्षाचा सहारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू शहराची व्याप्ती वाढत असताना या शहरात पाच ठिकाणी प्रवाशी निवारे बांधण्यात आले त्या पैकी तीन प्रवाशी निवाऱ्याकडून बसेस जात नाही पण विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा बनला असून प्रवाशी पिंपळ वृक्षाचा सहारा घेत आहे.
विकास चौकाला एस टी महामंडळाने बोर धरण फाटा असे नाव दिले आहे याच फाट्यावर सेलुतील बस स्थानका वरून जाणाऱ्या प्रवाश्यापैकी जास्त प्रवासी बोराधरण फाट्यावरून येजा करत असतात त्या मुळे येथे लाखो रुपये खर्च करून प्रवाशी निवारा बांधण्यात आला पण तो चुकीच्या जागेवर असल्याने त्या प्रवाशी निवाऱ्यात कोणीही प्रवाशी निवारा घेत नाही तर ७० वर्षाहून अधिक काळापासून प्रवाशी जेथे उभे राहून बस ची प्रतीक्षा करतात ते पिंपळाचे झाड आजही प्रवाश्यांना निवारा देत आहे.
या चौकात तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, ट्रेझरी, पाट बंधारे, कृषी, पंचायत समिती, व ग्रामीण रुग्णालय आहे.येथून बोर धरण, गरमसूर, नागपूर, हिंगणा, आदी ठिकाणी जाण्यास सोयीस्कर असा चौक आहे. गत काही वर्षा अगोदर या चौकात प्रवाशी निवारा बांधण्यात आला पण बसेसची प्रतीक्षा करण्यासाठी प्रवाशी पिंपळवृक्षाच्या सावली चा सहारा घेताना दिसत आहे.
सेलू शहरात एका महाविद्यालया जवळ प्रवाशी निवारा तर यशवंत चौकात रस्त्याच्या दुतर्फा दोन प्रवाशी निवारे बांधण्यात आले पण या रस्त्याने आता बसेस जात नसल्याने ते अडगळीत पडले तर नव्याने झालेला रस्ता पाहता यशवंत चौकात उभारलेला प्रवाशी निवारा उन्हाळ्यात व पावसाळ्यात प्रवाश्यांना साधे उभे राहण्याची निवारा देत नाही तर विकास चौकातील प्रवाशी निवारा हा शोभेचा राहिला आहे.
*बहुतांश बसेसचा विकास चौकाला बाय बाय*
सेलू शहरा बाहेरून झालेल्या रस्त्यामुळे नागपूर वरुण वर्धा कडे जाणाऱ्या लांब पाल्याच्या बहुतांश बसेस या विकास चौकात येत नसल्याची ओरड होत आहे त्या मुळे या चौकातून प्रवाश्यांना विकास चौक गाठावा लागतो तर आता नव्याने सुरू झालेल्या इ बस फक्त या चौकात येत असल्याचे बोलल्या जात आहे



