ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने दिनांक २३.०५.२०२६ व २४.०५.२०२६ रोजी विशेष माहिम नाकाबंदी दरम्यान संपुर्ण वर्धा जिल्हयात वाहन चालक यांना चेक केले असता कलम १८५ (दारु पिऊन वाहन चालविणे मोटार वाहन कायद्यानुसार पोलीस स्टेशन सेवाग्राम-३, अल्लीपूर-३, आर्वी-१, कारंजा-२, पुलगांव३ व वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा-४ अशा एकुण १६ केसेस करण्यात आल्या आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकांची नावे १) अमोल कालिदास थुल वय ४४ वर्ष रा. वरुड, २) विक्की नारायण राऊत वय ३२ वर्ष रा. मनीष नगर मसाळा, वर्धा ३) अनंता पुरुषोत्तम बोरेकार वय ५२ वर्ष रा. फुकटा ता. हिंगणघाट जि. वर्धा ४) दामोदर चंद्रभान शेलकर वय ५० वर्ष रा. शिरसगाव ५) आकाश पुरुषोत्तम जगताप वय २८ रा. खरवडा ता. वरोरा जि. चंद्रपूर ६) नरेंद्र मारोती डोंगरे वय ४३ वर्ष रा. कारंजा ७) निलेश प्रेमराज डोबले वय ३५ वर्ष रा. खैरी पुनर्वसन कारंजा घा. ८) योगेश रमेशराव तलमले वय ३७ वर्ष रा. घुबडटोली पुलगांव ९) उमेश रामकृष्ण जुआरे वय ५८ रा. रोहना ता. आर्वी जि. वर्धा १०) दिवाकर दशरथ पारिसे वय ४० वर्ष रा. चिंचोली ता. धामनगाव जि. अमरावती ११) करण गुरुदयाल फडके वय ५६ वर्ष गणेश नगर, वर्धा १२) आनंद त्र्यबंकराव पाटील वय ६४ वर्ष रा. येळाकेली वार्ड क्र.५, वर्धा १३) अजय विजय भोयर रा. केशव सिटी सिदी मघे, वर्धा १४) सचिन सिर्धात शेंडे रा. बोरगाव मेघे, वर्धा यांची मेडिकल तपासणी केली असता त्यांचे रक्ता मध्ये अल्कोहोल चे प्रमाण जास्त प्रमाणत मिळून आले या प्रमाणे नमुद वाहन चालक दारुच्या नशेत वाहन चालविताना मिळून आलेत. तसेच वर्धा जिल्हयामध्ये वाढत्या अपघातावर प्रतिबंध घालण्याकरीता सदर विशेष मोहिम दररोज संपुर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येणार असून नागरिकांना सुचित करण्यात येते की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अती वेगाने व दारु पिऊन वाहन चालवू नये. वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये