सीएसआर निधीतून ग्रामीण रुग्णालय भद्रावतीला आधुनिक उपकरणांची मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे सोमवार, दि. २५ मे रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. म्युनिशन्स ऑफ इंडिया लिमिटेड, चांदा तर्फे सीएसआर निधीतून ग्रामीण रुग्णालयाला ओटी टेबल, सक्शन मशीन व ॲनेस्थेशिया मशीन अशी चार महत्त्वाची शस्त्रक्रिया उपकरणे प्रदान करण्यात आली.
या आधुनिक उपकरणांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून शस्त्रक्रिया सेवांना मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदाचे मुख्य महाप्रबंधक प्रवीण कुमार पांडे, एचआरडीसीचे के. एम. खडसे, विभागीय अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सन २०२५-२६ या कालावधीत ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने ऑर्डिनन्स फॅक्टरी चांदा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यातूनच ही अत्यावश्यक उपकरणे रुग्णालयाला प्राप्त झाली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष सिंग यांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी श्वेता कंचर्लावार, एनसीडी समुपदेशक यांनी केले, तर आभार प्रदर्शन एमपीडब्ल्यू मनोज कायरकर यांनी केले.
कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.



