ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे यांचे वतीने तसेंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वाटप करण्याचा कार्यक्रम दि. 07/04/2026 रोजी शाळेच्या सभागृहात पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय गाडगे होते. तार प्रमुख अतिथी मनून राजेश मांढरे, सुनैना तांबे,अरुणा सालवटकर, संघमित्र ताकसांडे हे सर्व पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्थेचे पदाधिकारी तैसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक /प्रचार महेंद्रकुमार ताकसांडे उपस्थित होते.या प्रसंगी वर्ग 5 वी ते 12 वी पर्यन्तच्या सर्व विद्यार्थ्यान्ना मान्यवरांच्या हंस्ते नोटबुक व पेन से वितरण करण्यात आले. कार्यक्रम साथी संस्थेचे अध्यक्ष डॉ आनंदराव आडबाले, सचिन नामदेवराव बोबडे तथा सर्व संचलकन्नी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघमित्र ताकसांडे यांनी केले.

संचलन शाळेच्या शिक्षिका कु. माधुरी उमरे यानी तर आभार जीवन आडे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये