ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधारांच्या हक्काच्या अनुदानासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर व नियमित मिळावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.मुनगंटीवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट

मानधनवाढीसाठी आ. मुनगंटीवार यांचा यापूर्वीही विधानसभेत आवाज; अर्थमंत्री असताना अनुदानवाढीसाठी पुढाकार

चंद्रपूर : निराधार, दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मानधन वाढविण्यासाठी यापूर्वी विधानसभेत आवाज उठवून, अर्थमंत्री असताना अनुदानवाढीसाठी पुढाकार घेणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळत नसल्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. ज्या अनुदानावर हजारो गरजू नागरिकांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे, ती रक्कम वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अनुदान वितरणातील विलंबामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मानधन लाभार्थ्यांना नियमितपणे आणि वेळेत मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांच्या आर्थिक गरजांना हातभार लागावा, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. विधानसभेत निराधारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यापासून ते अर्थमंत्री म्हणून अनुदानवाढीसाठी पुढाकार घेण्यापर्यंत त्यांनी या घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. राज्याचे अर्थमंत्री असताना आ.मुनगंटीवार यांनी अनुदानाची रक्कम ६०० रुपयांवरून १,२०० रुपये केली. त्यानंतरही ही मदत अपुरी पडत असल्याची जाणीव ठेवून, मानधन १,२०० रुपयांवरून १,५०० रुपये करण्यासाठी त्यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. निराधारांच्या आर्थिक गरजांची जाणीव ठेवून मानधनवाढीसाठी प्रयत्नशील राहिलेल्या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आता या लाभार्थ्यांना मंजूर अनुदानाची रक्कम वेळेवर आणि नियमित मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम नियमितपणे मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या योजनेतील अनुदान हे लाभार्थ्यांसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे अनुदान वितरणात होणारा विलंब टाळून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला निर्धारित वेळेत अनुदान मिळणे आवश्यक आहे.अनुदान वितरणात विलंब होण्यामागील तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी दूर करून लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच भविष्यात अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

मानधनवाढीसाठी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्याप्रमाणेच आता निराधार लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर मिळावे, यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. समाजातील सर्वाधिक गरजू घटकांना त्यांच्या हक्काची आर्थिक मदत नियमितपणे मिळावी, हा या मागणीमागील प्रमुखउद्देश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये