ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  ‘पर्यावरण सेवा योजना’ व इको क्लब अंतर्गत *सीड बॉल निर्मिती कार्यशाळेचे* यशस्वी आयोजन 8 एप्रिल रोजी करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल उचलत हजारो सीड बॉल्स तयार केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देत मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीक शास्त्र चे प्रा रोशन मेश्राम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल म्हणजे काय, ते कसे बनवले जातात आणि पावसाळ्यात त्याचा उपयोग करून कमी श्रमात कशी वृक्षलागवड करता येते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले.

प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर ती जगवणे ही काळाची गरज आहे. सीड बॉलच्या माध्यमातून आपण ओसाड जमीन पुन्हा हिरवीगार करू शकतो.”

या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन माती, खत आणि विविध वृक्षांच्या बियांचे मिश्रण करून सीड बॉल्स तयार केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये