ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत तलवार व सत्तूर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

भंगाराम वार्डात गुन्हे शोध पथकाची कारवाई : ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    घरामध्ये बेकायदेशीररीत्या प्राणघातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी रोहित संदीप मेश्राम (वय ३०, रा. भंगाराम वार्ड) याला अटक केली आहे. २४ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्हे शोध पथकाने पंचांच्या समक्ष आरोपीच्या घरावर छापा टाकला. झडतीदरम्यान पोलिसांना घरातून ३ हजार रुपये किमतीची एक धारदार तलवार (लांबी ८३ सेमी) आणि २ हजार रुपये किमतीचा एक सत्तूर (लांबी ४० सेमी) असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार खुशाल कावळे यांच्या फिर्यादीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष केदार, पोहवा गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे, अनुप आष्टुनकर, प्रशांत शेंडे, पोअं योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि मपोअं मोनाली गारघाटे यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये