ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा न्यायालयासमोरील हत्या प्रकरणी ‘त्या’ आरोपीला सहा दिवस पोलीस कोठडी

लोक अभिरक्षक कार्यालयाने पुरविली मोफत विधी सेवा 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : राजुरा न्यायालयासमोरील टपरीवर बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला.याप्राणघातक हल्ल्यात डोक्यात आणि छातीत गोळ्या लागल्याने विनोद ऊर्फ पापा जाधव राहणार सोमनाथपुर वाॅर्ड, राजुरा जिल्हा चंद्रपूर यांचा मृत्यू झाला होता.त्या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली आहे.या गुन्हयाकामी दि.२५ नोव्हेंबर रोजी बुधवारी चंद्रपूर जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयात अटकेतील आरोपी अनिलसिंग मंजितसिंग खिच्ची वय ३८ वर्षे धंदा चाबी बनविणे राहणार खकनार खुर्द पाचोरी ता.खकनार जि बुरहानपुर ( मध्य प्रदेश) यास राजुरा पोलीसांनी रिमांडकामाकरीता हजर केले होते.

     त्यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाने आरोपीला मोफत विधी सेवा पुरविली.लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात वकील पत्र सादर केले.पोलीसांनी आरोपीची पोलीस कोठडी मिळावी असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.

सदर गुन्हयात मयताचा खुन करण्यास वापरलेले पिस्टल (अग्निशस्त्रे) व जिवंत काडतुसे अटकेतील आरोपी अनिलसिंग मंजितसिंग खिच्ची याने पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे मुद्दयावर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.आरोपीच्यावतीने अॅड विनोद बोरसे यांनी युक्तिवाद करून पोलीस कोठडी मिळणेच्या विनंतीला विरोध केला.गुन्हयाचे गांभीर्य पाहून आणि पोलीसांना तपासाची संधी मिळावी यासाठी विशेष मकोका न्यायालयाने आरोपीला सहा दिवस म्हणजेच दिनांक ३० नोव्हेंबर सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशेष मकोका न्यायालयात आरोपीची बाजू अॅड विनोद बोरसे मांडत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये