ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सांवगी मेघे पोलीसांकडुन वॉश आउट मोहिम

अवैध गावठी मोहा दारूच्या भट्टी चालवीणाऱ्यांवर धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 26/11/2026 रोजी पो.स्टे. सावंगी मेघे हद्दीत मौजा पांढरकवडा पारधी बेडा येथे अवैधरीत्या दारू निर्मीती संबंधाने वॉशआउट मोहिम राबवीत गावठी मोहा दारूची निर्मीती करीता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करणारे तसेच गावठी मोहा दारूची हातभट्टी लावणारे ईसमांवर प्रोरेड कारवाई करून मोठ्या प्रमाणात कच्चा मोहा रसायन सडवा गावठी मोहा दारू तसेच मोहा दारू निर्मीती करीता लागणारे साहित्य असा एकुण जु.किं. 8,27,000/रू. चा मुद्देमाल मिळूल आल्याने 4 आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकुण 4 केसेस करण्यात आल्या.’

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब यांचे मार्गदर्शनात पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, पो.उप. नि. गोपाल शिंदे, पोउपनि मधुकर सामलवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, अनिल वैद्य, राजेश राठोड, निलेश इंगोले, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, राहूल नागपुरे, वैभव जगणे, श्याम सलामे, संजय पटले सर्व पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये