ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सावंगी मेघे ह‌द्दीतील गावठी मोहा दारूची हातभट्टी चालवीणाऱ्या ईसमाची एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत जिल्हा कारागृह अकोला येथे रवानगी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सावंगी मेघे ह‌द्दीतील घोकादायक ईसम नामे कालूसिंग ठाकूरसिंग भादा वय 46 वर्ष रा. सिखबेडा सावंगी मेघे, ता.जि. वर्धा. याचे विरूध्द पो.स्टे. सावंगी मेघे चे अभिलेखावर अवैधरीत्या कच्चा मोहा रसायन सडवा तयार करून त्यापासून गावठी मोहा दारूची हातभट्टी लावून गावठी मोहा दारू तयार करून दरूची विकी करणे, संबंधाने विविध गुन्हे नोंद आहे. तसेच तो गावठी मोहा दारू गाळण्याकरीता तयार केलेल्या कच्चा मोहा रसायन सडव्यामध्ये अधिक नशा व गुंगी येण्याकरीता शरीरास हानीकारक अशा वस्तुंचा उपयोग करीत होता. त्यांच्याकडे उपलब्ध गावठी मोहा दारू ही अशुध्द असुन शासनाने प्राधिकृत केलेल्या दारू उत्पादनाच्या मानकांशी सुसंगत नाही अशा तंत्रशुध्द पध्दतीशीवाय बनविलेली गावठी मोहा दारूच्या सेवनाने मानवी शरीरास मोठ्या प्रमाणात हानी पोहचण्याची शक्यता आहे. स्थानबध्द ईसम नामे कालूसिंग ठाकूरसिंग भादा याने पो. स्टे. सावंगी मेघे परीसरात तसेच मौजा सिखबेडा परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वताची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरूध्द रिपोर्ट देण्यास पोलीस स्टेशनला समोर येण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनिक जिवन विस्कळीत झाले होते व तरूणवर्ग दारूचे व्यसनाधीन होत चालले होते. कालूसिंग भादा याच्या कृत्यामुळे पो.स्टे सावंगी मेघे अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने व त्याची गुन्हेगारी गतिविधी थांबत नसल्याने त्याच्या विरुध्द प्रभावी प्रविबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या परंतू तो केलेल्या कार्यवाहीस सुध्दा जुमानत नसून त्यानंतरही सतत गुन्हे करीत होता.

त्या अनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक श्री विनोद गिरी, पो.स्टे. सावंगी मेघे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 (सुधारण 2015) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक वर्धा यांच्या मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, मा. श्रीमती वान्मथी सी. यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्धा यांनी दि. 25/11/2026 रोजी 01 वर्षाकरीता स्थानबध्द आदेश जारी करून कालूसिंग ठाकुरसिंग भादा यास अकोला जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थनबध्द आदेशान्वये त्याला जिल्हा कारागृह अकोला येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनिल महाडीक साहेब, पो.नि. श्री विनोद गिरी सा, ठाणेदार, पो.स्टे. सांवगी, पोलीस अंमलदार आशिष महेशगौरी, अमोल आत्राम स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन घेवंदे, संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, शुभांगी महाजन पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये