ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गावर जड वाहतूक बंद चे आदेश दिले असताना सुद्धा जड वाहतूक सुरूच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची जड वाहतूक तातडीने बंद चे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतु अजूनही या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मात्र प्रवाश्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रवासी बसेस पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी दिले आहेत.

महामार्गावरील रेल्वे फाटकाजवळ ६५ मीटर पुलाचे आणि अंडरपासचे काम सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहनांना बंदी घालणे अपरिहार्य होते. परंतु, महामार्ग पूर्णपणे बंद केल्यास शाळा-कॉलेजात जाण्यासाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांचा वेळ आणि जनतेला लांबच्या पर्यायी मार्गामुळे होणारा आर्थिक खर्च टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘ना-हरकत’ अहवालानंतर प्रवासी वाहतूक या मार्गावरून धावण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे.

• ब्रह्मपुरीवरून जाताना: सर्व जड वाहने ब्रह्मपुरी → वडसा मार्गे वळवण्यात आली आहेत.

• गडचिरोलीकडून येताना: गडचिरोली → आरमोरी → वडसा मार्ग अथवा गडचिरोली → आरमोरी → गांगलवाडी → तळोधी → नागभीड या मार्गाचा वापर करावा.

या निर्णयामुळे उड्डाणपुलाचे कामही वेगाने पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रवासही सुरक्षित व विनाव्यत्यय सुरू राहील

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये