ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत १३ ऑक्टोबरला भव्य माँ का जगराता : नामवंत कलाकारांची उपस्थिती

वर्धापन दिन व नवरात्रोत्सवानिमित्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर आणि रविंद्र शिंदे मित्र परिवाराचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर आणि रविंद्र शिंदे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रस्टच्या वर्धापन दिनाचे व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून देवभूमी भद्रावती नगरीत मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ‘माँ का जगराता’ आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा सायंकाळी ६ वाजल्यापासून शिंदे महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडणार आहे.

या जगरात्याच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा मंगलमय संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात माता राणीच्या भक्तिगीतांनी आणि देवीच्या जागरणाने वातावरण भक्तिमय होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे, पार्श्वगायिका व परफॉर्मर ईशरत जहाँ तसेच ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील भूमिकेमुळे परिचित असलेली अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा यांची विशेष उपस्थिती हे या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. या कलाकारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढणार असून, भाविक व नागरिकांना एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, ट्रस्टच्या सचिव रूपाली शिंदे आणि ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तथा मित्र परिवार यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेली नाळ अधिक दृढ करण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे.

या भव्य जगरात्यासाठी नागरिकांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून, माता राणीच्या भक्तीमय जागरणात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन रविंद्र शिंदे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये