कैलाशनगर क्रिकेट टूर्नामेंटचा उत्साहात समारोप
न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्ट विजेता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कैलाशनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट ग्राउंडवर आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंटचा समारोप उत्साह आणि रोमांचक वातावरणात पार पडला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांना थरारक सामने पाहायला मिळाले.
अंतिम सामन्यात न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्ट संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले. संघाने कर्णधार चिंटू निषाद यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट समन्वय आणि खेळभावनेचे दर्शन घडवले. उपविजेता म्हणून नकोडा लिजेंड्स संघानेही कडवी झुंज दिली, तर साखरा संघाने तिसरे स्थान मिळवले.
स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीच्या आधारेही खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. जाहिद इब्राहिम शेख यांना उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘बेस्ट बॉलर’ पुरस्कार देण्यात आला, तर सोहेल इब्राहिम शेख यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्टने केवळ खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही, तर युवकांना क्रीडा क्षेत्राकडे प्रेरित करण्याचेही स्तुत्य कार्य केले आहे. संस्था सामाजिक उपक्रमांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देत युवकांना योग्य दिशा देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.



