गडचांदुरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
साठ रक्तदात्यांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्हा व कोरपना – जिवती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या संयुक्त विद्यमानाने केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांनी शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी रक्तदान केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती अरुण निमजे, जिल्हा बँकेचे माजी संचालक विलास धांडे, डॉक्टर प्रदीप खेकडे,डॉक्टर किसन भोयर,निलेश ताजने, सतीश उपलेंचिवार, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंटी घाटे, सचिव जितू राजा, संघटन सचिव प्रशांत गोठी, कोरपना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत देवतळे, जिवती तालुकाध्यक्ष मोहम्मद मुजाहिद देशमुख, विनोद चटप, देविदास खंदारे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरपना व जिवती तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी सहकार्य केले.