
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तहसिल कार्यालय सिंदखेड राजा येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला, या निमीत्ताने तहसिल कार्यालयातून मतदार जागृती रॅली काढून जनजागृती कऱण्यात आली, रॅलीला हिरवी झेंडी तहसीलदार दिवटे यांनी दाखविली, रॅलीत विद्यार्थी,शिक्षक, अधिकारी कर्मचारी,नागरिक सहभागी झाले होते.
याप्रसंगी खरात महसूल अधिकारी, संजय सोनुने,राहुल देशमुख ग्रामविकास अधिकारी,महसुल सहाय्यक, संजय आटोळे महसूल सेवक,राजु खरात महसूल सेवक,आकाश माघाडे महसूल सेवक,देविदास ठाकरे माजी नगराध्यक्ष ,शाम मेहेत्रे समता परिषदेचे अध्यक्ष, गजानन मेहेत्रे, नंदु वाघमारे, मुकुंद पाठक पत्रकार सिंदखेडराजा येथील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.विद्यार्थ्याना प्रमाणत्र देण्यात आले.