Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे २५ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रका नुसार महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मतदार जागृती विषयी शपथ घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे यांनी शपथ चे वाचन केले, आणि त्यांच्या मागून महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी शपथ म्हटली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून Nothing like voting, I vote for sure या थीमवर मतदार जागृती या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयवंत काकडे यांनी मतदार जागृती, मतदानाचे महत्त्व, मतदान करणे आवश्यक आहे, भारतातील १८ वर्षावरील नागरिकांनी मतदान केलेच पाहिजे, या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संगीता आर.बांबोडे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रमेश पारेलवार यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, डॉ. तितरे, डॉ. यशवंत घुमे, डॉ. तेलंग, डॉ. खामनकर, प्रा. दाते, प्रा. खोके, प्रा. बैराम, श्रद्धा वऱ्हाडे, वामन अंडरस्कर आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये