ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंताळधाबा गावाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक!

५० लाख रुपये व सन्मानचिन्हाचा मानाचा पुरस्कार प्राप्त!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा :_ आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने चिंताळधाबा गावात विविध विकासकामांना चालना मिळाली. भाऊंच्या माध्यमातून विविध निधी उपलब्ध झाल्याने गावात १०० टक्के सौरऊर्जेचा उपक्रम, स्मशानभूमी, आरओ शुद्ध पाणी व्यवस्था तसेच इतर अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत.

या विकासप्रवासात गावच्या सरपंच शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे आणि विशेषतः कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी आनंद काटकमवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. गावाच्या विकासाबद्दल तळमळ, आपल्या कामाप्रती निष्ठा आणि गावाविषयी असलेले प्रेम यामुळे चिंताळधाबा गावाने आज विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

या सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना यश मिळाले असून चिंताळधाबा गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गावाला ५० लाख रुपये आणि सन्मानचिन्ह (शील्ड) पुरस्कार स्वरूपात प्रदान करून गौरविण्यात आले.

हा सन्मान केवळ एका गावाचा नसून गावाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या प्रत्येक हाताचा आणि प्रत्येक प्रयत्नाचा गौरव आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, सरपंच शुभांगी कुत्तरमारे, उपसरपंच रोशन ठेंगणे, ग्रामविकास अधिकारी आनंद काटकमवार तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य आणि चिंताळधाबा ग्रामस्थांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

अभिमान आहे चिंताळधाबा गावाचा! गावाचा विकास, गावाचा सन्मान!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये