ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरमध्ये २० नोव्हेंबर रोजी श्री श्याम संध्या ; पटोत्सव तथा प्रकटोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ श्री खाटू श्याम बाबांच्या पटोत्सव तथा प्रकटोत्सवानिमित्त गडचांदूर येथे श्री श्याम सेवा समितीच्या वतीने भव्य श्री श्याम संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा भक्तिमय सोहळा शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजल्यापासून श्री दत्त मंदिर, गांधी चौक, गडचांदूर येथे पार पडणार आहे.

या मंगलमय कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील श्यामप्रेमी भक्तांना बाबांच्या भक्तिरसात तल्लीन होण्याची संधी मिळणार आहे. या धार्मिक सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर श्री खाटू श्याम बाबा चा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या धार्मिक सोहळ्या जास्तीत जास्त भाविकांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून श्री खाटू श्याम बाबांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजक श्री.श्याम सेवा समिती, गडचांदूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये