वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे ऑक्टोबर २०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माहे ऑक्टोबर-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक दिनांक 17. 11.2026 ला पोलीस स्टेशन सेलु हददीत मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आगामी सण-उत्सवांच्या काळातील प्रतिबंधक उपाय, सायबर सुरक्षा, तसेच पोलीस प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला व महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीदरम्यान विविध विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (PPT) व प्रशासकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
१. CEIR पोर्टल बाबत पी.पी.टी. च्या अनुषंगाने पो.स्टे. सायबर चे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत पाटील यांनी पीपीटी सादरीकरण केले त्यात त्यांनी हरविलेले मोबाईल तकारी कश्या कराव्या व ते ट्रेस कसे केले जातात तसेच हरविलेले मोबाईल परत कसे हस्तगत केले जातात याबाबत माहिती सादर केली.
२. NDPS तपासाबाबत पी.पी.टी. सादरीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. सुनिल महाडिक यांनी केले त्यामध्ये NDPS गुन्हयाचा तपास कश्या पध्दतीने करावा तसेच कायद्याच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत व त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात यावी याचे मार्गदर्शन केले. तसेच NDPS चा गुन्हयाचा तपास करुन त्यात शिक्षा कशी प्राप्त करावी याबाबत माहिती देवुन सविस्तर तपास संबंधाने सुचना दिल्या.
3. अंमली पदार्थाचे बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेज माहे ऑक्टोबर महिन्यात जिल्हयात NDPS कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे यातील मुळ आरोपी व स्त्रोत पर्यंत पोहचण्याकरीता गुन्हयांचे बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेज संबंधाने स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरिक्षक श्री विनोद चौधरी यांनी पीपीटी व्दारे माहिती सादर केली.
३. कायदा व सुव्यवस्था संदर्भाने घडणा-या घटना आगामी सण उत्सव, टिपू सुलतान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन, गुरुनानक जयंती संबंधाने लावण्यात येणारा बंदोबस्त तसेच जिल्हा विशेष शाखेतील सर्व कामकाजाचे संदर्भाने सपोनि श्री मिलिंदकुमार दवणे यांनी पीपीटीद्वारे माहिती सादर केली.
४. ई-बीट प्रणाली : ई-बीट प्रणाली पी.पी.टी. सादरीकरण पोलीस नियंत्रण कक्ष येथील पोलीस निरिक्षक श्री अनिल मेश्राम यांनी सादर केले असुन त्यात पोलीस बिट प्रणाली ही प्रभावीपणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि पोलीस उपस्थिती व सदृश्यता वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी राबविली जात आहे. जीपीएस सक्षम मोबाईल एप्लीकेशन आणि थेट डाटा ट्रॅकिंगचा वापर करून ई-बीट प्रणाली नागरिकांचे समस्येचे निराकरण करते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या –
पीपीटी सादरीकरणानंतर घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस अधीक्षक यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले. दोषारोप निर्गती (Charge Sheet) दोषारोप पत्र लवकरात लवकर निर्गमित करण्याबाबत निर्देश दिले.
अपघात प्रतिबंध (Fatal Accident Prevent) अपघाती (Fatal) गुन्ह्यांचा तपास करुन अपघातास कारणीभुत असलेले कारणे यांचा शोध घेवुन अपघात प्रतिबंध करण्यासंबंधाने संचना दिल्या.
सेशन कमिटेड केसेस सर्व प्रकारचे सेशन कमिट गुन्हे यांचा तपास अत्यंत गांभिर्याने व तांत्रिक पध्दतीने करुन गुन्हेगारांना शिक्षा होईल व कोणताही गुन्हा निर्दोष सुटणार नाही याबाबत तपास संबंधाने सुचना दिल्या.
पोलीस स्टेशनचे वातावरण व कल्याणकारी उपाय- पोलीस स्टेशनचे वातावरण ताणतणावमुक्त व चांगले ठेवण्याबाबत आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कुटूंबाशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले.
अवैद्य धंदे व स्टिट काईम जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे खपवुन घेतले जाणार नाही तसेच स्ट्रिट काईम यांना अत्यंत गांभिर्याने घेवुन अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाही याकरीता करावयाच्या उपाययोजना संबंधाने माहिती दिली.
या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस वाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर सर्व संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकी नंतर मा. पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी आढावा बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले.


