ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगाव हद्दीत अवैध देशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

चारगाव (बु.) येथील महिलेच्या घरातून ४३ हजार २५० रुपयांचा दारू साठा जप्त : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चारगाव (बु.) येथे एका महिलेच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ४३ हजार २५० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, चारगाव (बु.), ता. वरोरा येथील मनिषा नितेश देठे (वय ३०) ही आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा ठेवून अवैधरित्या विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला. यावेळी ९ पेट्यांमध्ये ठेवलेल्या ९० मिली क्षमतेच्या एकूण ८६५ देशी दारूच्या शिश्या आढळून आल्या. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला असून, त्याची किंमत ४३ हजार २५० रुपये आहे.

या प्रकरणी आरोपी महिला मनिषा नितेश देठे हिच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार नितीन कुरेकर, पोलीस हवालदार सचिन गुरनुले, पोलीस हवालदार प्रमोद कोटनाके आणि पोलीस शिपाई अमोल सावे यांच्या पथकाने केली. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये