देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी व वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड, जेष्ठ नागरिक संघटना चे अध्यक्ष प्रा विनायक कुळकर्णी होते, सर्वप्रथम इंदिरा गांधी व वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाला गोविंदराव बोरकर,प्रकाश अहिरे, रमेश नरोडे, प्रा. विजय रायमूल, अरुण सपाटे, मार्तंड आप्पा घिके, तथा इतर उपस्थित होते, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी व वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदराव बोरकर यांनी केले.


