प्रांत अध्यक्ष डॉ. नारायणजी मेहरे यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीला सदिच्छा भेट
महिलांचा संघटनात्मक कार्यातील सहभाग वाढविण्यावर विशेष भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका भद्रावतीच्या वतीने विदर्भ प्रांताचे अध्यक्ष माननीय डॉ. नारायणजी मेहरे सर यांची सदिच्छा भेट आयोजित करण्यात आली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या भेटीत त्यांनी पदाधिकारी व सदस्यांना संघटनात्मक कार्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे कार्य अधिक व्यापक व परिणामकारक करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः संघटनेत महिलांचा सहभाग वाढविणे, त्यांना ग्राहक हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देणे, संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवणे आणि ग्राहकहिताच्या प्रश्नांवर महिलांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, यावर डॉ. मेहरे सर यांनी विशेष भर दिला.
याशिवाय ग्राहक संरक्षण, जागृती, संघटनात्मक बांधणी, नवीन सदस्य नोंदणी आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या वेळी विदर्भ प्रांत सदस्य मा. वसंत वऱ्हाटे, जिल्हा मार्गदर्शक मा. पुरुषोत्तम मत्ते, जिल्हा सदस्य मा. वामन नामपल्लीवार, तालुका अध्यक्ष बालाजी दांडेकर, तालुका सचिव बाळा कुटेमाटे, कोषाध्यक्ष गोपाल घुमे, मार्गदर्शक शेखर घुमे, महिला सहसचिव सौ. गीता जय तथा आनंदराव कटलावार, वसंत देवलवार, केशव मेश्राम, विठ्ठल ढवळे आदी प्रामुख्याने उपस्थिती होते.


