ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिव्हाळा मित्र मंडळातर्फे जागतिक पुरूष दिन साजरा 

पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जागरूकता गरजेची! _ सामाजिक कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे यांचे प्रतिपादन 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ पुरूषांनी महिलांशी सौजन्याने वागले पाहिजे, महिलांविषयी आदर बाळगला पाहिजे.निकोप समाजाच्या निर्मितीसाठी महिलांनी देखील पुरूषांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे जेणेकरून महिला व पुरुष यांच्यात कोणतेही वाद उपस्थित होणार नाहीत. महिलांवर होणारे अत्याचार निश्चितच थांबलेले नाहीत.महिलांच्या माध्यमातून पुरुषांविरूध्द विविध गुन्हे दाखल झालेचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.पुरुषांविरूध्द केले जाणारे सर्वच आरोप सिद्ध होत नसल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत, त्यामुळे पुरूषांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जागरूकता गरजेची असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर येथील एकोरी वार्डातील सामाजिक कार्यकर्ते तथा पुरूष हक्क व संरक्षण कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे यांनी केले .

* जिव्हाळा मित्र मंडळातर्फे जागतिक पुरूष दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अॅड विनोद बोरसे बोलत होते.

* अॅड विनोद बोरसे यांनी जागतिक पुरूष दिनाची माहिती देताना सांगितले की,

* सन १९६० पासून पुरूषांच्या विकासाचे कार्यक्रम जगूभरात राबविण्यात आले.मात्र सन १९९२ पासून यु.एस., आॅस्ट्रेलिया ,माल्टा, टोबॅको, आदी देशांमध्ये १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरूष दिन म्हणून साजरा केला जातो.

* समाजात अनेक पीडित पुरूष आहेत . तेव्हा पुरूषांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यावे.पुरूषांच्या समस्या केवळ कौटुंबिक नाहीत तर पुरूषांच्या आरोग्याची काळजी घेणे, पुरूषांमधील लैंगिक विषमता दूर करणे, पुरूष व लहान मुले यांची समाजातील प्रतिमा नेहमी चांगली राखुन आदर्श पुरुष घडविणे , पुरूषांचा सर्वांगीण विकास व्हावा यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण उद्देशांसाठी जागतिक पुरूष दिन साजरा व्हायला पाहिजे, असे देखील अॅड बोरसे यांनी यावेळी सांगितले

* पुरूष दिन साजरा करणे म्हणजे कमीपणाचे लक्षण समजुन भारतीय पुरूषांमध्ये एक अनामिक भिती,न्युनगंडता, संकुचित वृत्ती दिसून येते.वास्तविक तसे न होता विशाल दृष्टिकोन ठेवून समाजातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी व निकोप समाज निमिर्तीसाठी, समाजात पुरुषांबददल आदर वाढावा, पुरूषांचे समाजासाठी व कुटुंबाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव व्हावा त्याचप्रमाणे पीडित पुरूषांच्या समस्या सोडवण्यासाठी एक विचारमंच उपलब्ध व्हावे यासाठी जागतिक पुरूष दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हायला पाहिजे असे देखील अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.

* कार्यक्रमाला जिव्हाळा मित्र मंडळाचे सदस्य रामदास चन्नुरवार, अविनाश टेकुलवार, ईश्वरदास ठाकरे, अमरचंद दंडेले, दिनकर क्षीरसागर, संजय आसुटकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये