इनव्हील क्लबतर्फे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
इनव्हील क्लब ऑफ भद्रावतीतर्फे दिनांक २० जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्लबच्या सर्व महिला सदस्यांना हळदी-कुंकू लावून व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हळदी-कुंकवाच्या या पवित्र सोहळ्यात विचारविनिमय करून क्लबची नवीन टीम गठित करण्यात आली. या कार्यक्रमाला इनव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रेमा पोटदुखे, सचिव सुनंदा खंडाळकर, वर्षा धानोरकर, डॉ. माला प्रेमचंद, कविता सुपी, रश्मी बिसेन, तृप्ती हिरादेवे, शुभांगी बोरकर, स्नेहा कावळे, वंदना धानोरकर, विश्रांती उराडे, विभा बेहरे, वैशाली सातपुते, कीर्ती गोहने, मनीषा ढोमने, व जयश्री कामडी आदी मान्यवर महिला सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या.