प्रतिबंधित सुगंधीत तंबाखुची अवैद्यरित्या वाहतुक
आरोपीवर रेड करुन कटेनरसह एकुण १ कोटी ५४ लाख १३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०५/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक उप विभाग हिंगणघाट परीसरात पेट्रोलिंग करित असतांना स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांना गोपनीय बातमीदारा कडून खात्रीशिर माहीती मिळाली की, “कटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९१६ या मधुन शासणाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.” अशी माहीती प्राप्ण झाल्याने सदर माहीती ही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सूचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमूण त्यांचे मार्फत हिंगणघाट ते हैद्राबाद जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील संविधान चौक, वडमेर येथे रोडवर नाकेबंदी करीत असतांना एक नारंगी रंगाचा कटेवर अशोक लेलॅन्ड कंपनीचा ज्याचा आरटीओ पासींग क्रमांक जि.जे. २० रि.डी. ९९१६ असा असलेला येतांना दिसला सदरचा कंटेनर हा खबरेप्रमाणे असल्याचे दिसून आल्याने नाकेबंदी दरम्याण कटेनर रोडचे बाजुला सुरक्षीतरीत्या थांबवून सदर वाहणाने चालकास कंटेनरचे खाली उतरवून त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्यागे १) विनोदकुमार रामबहादुर यादव, वय ३४ वर्ष, रा. नारोल जि अहमदाबाद राज्य गुजरात व त्याचा सहकारी क्लिनर याने त्याचे नाव २) कमलेश छोटेलाल वणवासी, वय २६ वर्ष, रा. भगवतगंज जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश असे सांगीतले. सदर कटेनरची पंचासमक्ष पाहणी करुन कटेनर मध्ये कोणत्या वस्तु आहे याबाबत विचारणा केली असता त्याने कटेनर मध्ये मुगंधित तंबाखू व इंतर वस्तू भरुन असल्याचे सांगीतले. मुंगधित तंबाखू वाहतुकीचावत त्यांना पासपरवाना विचारला असता त्यांनी त्यांचेजवळ कोणताही पासपरवाना नसल्याचे सांगीतले.
पुढील कायदेशिर कारवाई करनेकरीता अन्न सुरवा अधिकारी श्री. पियुष मानवतकर, अन्न व औषधी प्रशासन विभाग, वर्धा यांचेशी संपर्क करुन ते बटनास्थळी हजर आल्याने अशोक लेलॅन्ड कंपनीच्या कंटेनर क्रमांक जि.जे. २७ टि.डी. ९९९६ यी पचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये दर्शनी भागात इतर वस्तु भरन असल्याचे दिसून आले व त्यामागे १) हिरव्या रंगाच्या प्लॉस्टीकच्या ५० चुगडया त्यामध्ये प्रत्येकी ४ छोटया बंग मध्ये प्रत्येकी १ किलोप्रम वजनाचे ६ व २०० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी असे ईगल सुगंधीत तंबाखू भरुन असलेले पॅकेट एकुण वजन १३२० किलोमि किमत २७,३९,०००/-रु. २) पांढल्या रंगाच्या पॉस्टीकच्या ५० गडा त्यामध्ये प्रत्येकी ६ छोटया बंग मध्ये प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ११ पॅकेट ईगल सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एकूण वजन १३२० किलोग्राम किंमत २८,०५,०००/- ३) पिवळया रंगाच्या पॉस्टीकच्या ८० मुंगडया त्यामध्ये प्रत्येकी छोटया बंग मध्ये प्रत्येकी १ किलोग्राम वजनापे १० पॅकेट होला सुगंधीत तंबाखु भरुन असलेले एकुण वजन ३२०० किलोग्रॉम किंमत ४२,४०,०००/-रु. ४) पांढप्या रंगाच्या लॉस्टीकच्या बॅग मध्ये खडचि १६ बॉक्स त्यामध्ये प्रत्येकी ५०० ग्रॅम वजनाचे २० हिनाचे डब्बे मज्जा सुगंधीत तंबाखू भरन असलेले एकूण वजन १६० किलोग्राम किमत ९,१२,०००/- रु. ५) पांढऱ्या रंगांच्या लॉस्टीकच्या बंग मध्ये खडर्याचे ३८ बॉक्स त्यामध्ये प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाचे ४० टिनाचे डब्बे मज्जा सुगंधीत तंबाखु धरन असलेले एकुण वजन ३०४ किलोग्रॉम किंमत १७.१७,६००/-रु. असा एकुण ६३०४ किलोग्रॉम सुगंधीत तंबाखु किंमत १,२४,१३,६००/-रु, ६) एक अशोक लेलॅन्ड कंपनीना कंटेनर क्रमांक जि. जे. २७ टि.डी. १९१६ किंमत ३०,०००/- असा एकुण जु. किंमत १,५४,१३,६००/- रु चा मुद्देमाल अवैधरीत्या विनापास परवाना वाहतूक करीत असतांना मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी नामे १) विनोदकुमार गमबहादुर यादव, वय ३४ वर्ष, रा. चरोल जि. अहमदाबाद राज्य गुजरात व त्याचा सहकारी किष्नर याने त्याचे नाव २) कमलेश छोरेलाल वणवासी, वय २६ वर्ष, रा. भगवतगंज जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेश यांचे विरुध्द पोलीस स्टेशन बडनेर येथे अप क्रमांक ०५/२०२६ कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) भा. न्या. सहीता सह कलम ३. २६(१), २६(२४), २७(১)(), ३०(२) (अ), ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६ अन्वये गुना नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, अन्न मुरक्षा अधिकारी श्री. पियुष मानवतकर, पोडपनी, बालाजी लालपारख्वाले, विजयसिंग गोमताडु, राहुल इटेकर, प्रकाश नागापुरे, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, अमर लाखे, अमरदीप पाटील, संद्रकांत पुररी, महादेव सानप, पवन पन्नासे, गजानन दरणे, रोशन निंचाळकर, रवि पुरोहीत, मंगेश आदे, रितेश कुराडकर, अभिषेक नाईक, गोविंद मुड़े सर्व नेमणूक स्थानीक गुनो शाखा, वर्धा यांनी केली.



