ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान 50 हजार रु.भरपाई देण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन 

डॉ. अभ्युदय मेघे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान वर्धा फोशल फोरमचे अध्यक्ष डॉ अभ्युदय मेघे व सदस्य मनिष तेलरांधे नगरसेवक शैलेश झाडे धोटे ताई विणा दाते अक्रम पठाण अविनाश उबाळे डफ मोहित सहारे व इतर सदस्य यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिक्षक सोनवणे साहेबांना विनम्र निवेदन देण्यात आले की मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटी झाली असून या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील चना तुळ गहू तसेच काही प्रमाणात उरलेला कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होवून त्यांची परिस्थिती अंत्यंत बिकट झाली आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देणे अत्यावश्यक आहे त्यामुळे प्रति हेक्टर किमान 50,000/- रुपये इतकी आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे व सदस्य यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये