ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ माणिकगड सिमेंट वर्क्सच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) विभागाच्या वतीने माणिकगडचे ई आर हेड नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनात युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात युवकांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना रोजगार, उद्योजकता आणि भविष्यकालीन कौशल्यांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ISM Academy चे प्रफुल मालेकर आणि उपेंद्र मालेकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी Environment Department चे सच्चिदानंद शुक्ला यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच CSR Section Head शंतनू आकाश यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व सांगून विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली ठाकरे यांनी केले, तर संगीत चांदेकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवकांनी कौशल्याधारित शिक्षणाचा स्वीकार करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेश देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये