पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट
जागतिक युवा कौशल्य दिना निमित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि डाखरे महाराज फाऊंडेशन, वडगांव ता. कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जुलै, २०२६ वेळ स.१०.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, हनुमान मंदिर, वडगांव, ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील १० वी, १२वी, आय. टी. आय., पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने, सदर रोजगार मेळावा आयोजन करण्यात येत आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशीप योजना व इतर असे एकूण १४५ पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये १. दालमिया सिमेट (भारत) लिमिटेड, २. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर माणिकगड सिमेंट वर्कस) ३. अंबुजा सिमेंट, लिमिटेड उपरवाही तह. कोरपना जि. चंद्रपूर ४. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना ५. सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ६. व्ही.आर इंटरप्राईजेस ७. सहयोग मल्टिस्टेट क्रेडरेटिव्ह सोसायटी इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते कडून कळविण्यात आलेले आहे.
मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे, जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in/ https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/https://pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करण्याबाबत तसेच उमेदवारांनी सदर रोजगार मेळावा मध्ये सहभाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.



