खंडीत विजपुरवठ्यामुळे मांगली परीसरातील शेतकरी त्रस्त
विज वितरण कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सततच्या खंडीत विजपुरवठ्यामुळे मांगली परीसरातील शेतकरी त्रस्त झाले असुन कृषीपंपांचा वीजपुरवठा सतत बंद रहात असल्याने खरीप पिके पाण्याअभावी संकटात सापडले आहेत.पावसाळा असुनही तालुक्यात पावसाने दडी मारली आहे.त्यामुळे पेरणी करण्यात आलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहे.पंपाव्दारे पाणी देऊन ही पिके वाचवण्याची धडपड येथील शेतकरी करीत आहे.
मात्र विजपुरवठा सतत बंद रहात असल्याने कृषीपंपाव्दारे पाणी देणे अशक्य झाले आहे. परीसरातील विजपुरवठा कधी पुर्णपणे तर कधी सिंगल फेस सुरु असतो त्यामुळे कृषीपंप सुरु होत नाही.याचा फटका सोयाबीन,तुर,कपाशी तथा इतर खरीप पिकांना बसत आहे.पाऊस नसल्याने अद्याप भातपेरणी सुरु झालेली नाही.मात्र विज पुरवठा बंद रहात असल्याने धानाची पर्हेसुध्दा वाचवीने मुश्कील झाले आहे.या भागातील विजपुरवठा त्वरीत सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मांगली येथील शेतकऱ्यांनी विज वितरण कंपणी कार्यालयात सादर केलेल्या एका निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना मांगली येथील शेतकरी उपस्थित होते.



