विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीतून, नापिकीमुळे नैराश्य,तणावातून उचलले टोकाचे पाऊल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती येथील पवन दत्ता राठोड (वय २३) या तरुण शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात येणारी अडचण आणि पिकांच्या नुकसानीमुळे नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
११ जुलै रोजी घरी विष प्राशन केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी (१६ जुलै) पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पवन राठोड यांच्या वडिलांचा आजारपणामुळे निधन झाले त्यानंतर त्यांचे पालनपोषण आजोबांनी केला मात्र आजोबाला वयोवृद्धात आजार जडल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पवनवर आल्याने त्यांनी शेती कामाला लागला.
मात्र वर्षानुवर्षे शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने तो कर्जबाजारीत अडकले होते. त्यांनी पेरणी केली होती,परंतु निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची स्थिती अत्यंत खराब झाली.यामुळे यंदाही अंगावरील कर्ज फिटणार नाही,या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते.मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार,सततच्या आर्थिक अडचणींमुळे पवन दत्ता राठोड नैराश्यातून विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे.



