ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंग्रजी साहित्य क्षेत्रात डॉ. मेश्राम यांचे संशोधनपर पुस्तक प्रकाशित

चांदा ब्लास्ट
 चंद्रपूर : स्थानिक जनता महाविद्यालय येथील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक व इंग्रजी साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि लेखक डॉ. प्रियदर्शी (पियुष) व्ही. मेश्राम यांचे “O. V. Vijayan and the Art of the Novel: A Perspective” हे संशोधनपर इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शोधसागर इंटरनॅशनल पब्लिकेशन्स, नवी दिल्ली यांनी केले आहे.
भारतीय इंग्रजी साहित्य आणि तुलनात्मक साहित्य अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या ग्रंथामध्ये मल्याळी मूळचे व कम्युनिस्ट विचारधारेचे प्रख्यात साहित्यिक व व्यंगचित्रकार ओ. व्ही. विजयन यांच्या कादंबरीलेखनाचा चिकित्सक व सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतील कथनशैली, कलात्मकता, तत्त्वज्ञान, प्रतीकात्मकता आणि आधुनिक भारतीय साहित्याला दिलेल्या योगदानाचा अभ्यासपूर्ण वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
संशोधनाची शिस्त, चिकित्सक दृष्टीकोन आणि समकालीन साहित्यविचार यांचा प्रभावी संगम या ग्रंथात दिसून येतो. इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त संदर्भग्रंथ ठरणार असल्याचा विश्वास साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
लेखक डॉ. प्रियदर्शी (पियुष) व्ही. मेश्राम यांनी यापूर्वीही साहित्य, संशोधन आणि सामाजिक विषयांवर लेखन केले असून, या नव्या ग्रंथामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनपर कार्यात आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या पुस्तक लेखनाचे श्रेय वडील ज्येष्ठ रिपाई नेते व्ही. डी. मेश्राम, आई प्राचार्य अनुपमा मेश्राम, संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. ए.के. महातळे, सर्वोदय शिक्षण मंडळ चे सचिव प्रशांत शांताराम पोटदुखे, डॉ. रमा गोळवलकर(पोटदुखे) हितचिंतक आणि मित्रपरिवार ला दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये