ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. योगेशभाऊ मिसार यांचेकडून दोन महिन्यांचे पूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत केले जमा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : यावर्षी राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नगर परिषद ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष श्री. योगेशभाऊ मिसार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या दोन महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना तसेच गरजू नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला आहे. वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस न मानता, समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या मानधनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस अर्पण केली.

शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, नैसर्गिक संकटांच्या काळात त्यांना आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. याच भावनेतून श्री. योगेशभाऊ मिसार यांनी घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरतो.

वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करत शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी योगदान देण्याचा नगराध्यक्ष श्री. योगेशभाऊ मिसार यांचा हा उपक्रम निश्चितच उल्लेखनीय आहे. – नगर परिषद, ब्रम्हपुरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये