ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्रैमासिक ऊर्जा मैत्री बैठक नियमित घेण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतची मागणी

उप कार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका भद्रावतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपअभियंता मा. चौरसिया साहेब यांना त्रैमासिक ऊर्जा मैत्री बैठक नियमितपणे आयोजित करण्याबाबत गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन सादर करण्यात आले.

वीज ग्राहकांच्या विविध समस्या जाणून घेणे, वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी, वीजबिलासंबंधी अडचणी तसेच ग्राहकांच्या इतर प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी ऊर्जा मैत्री बैठक महत्त्वाची आहे. ग्राहक आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी दर तीन महिन्यांनी ही बैठक नियमितपणे आयोजित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

वीज ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्यांचे समाधानकारक निराकरण व्हावे आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी त्रैमासिक ऊर्जा मैत्री बैठक नियमित घेणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सदस्य मा. श्री. वसंत वऱ्हाटे, जिल्हा सदस्य मा. श्री. वामन नामपल्लीवार,  तालुका सचिव श्री.बाळा कुटेमाटे, कोषाध्यक्ष, श्री. गोपाल घुमे, मार्गदर्शक श्री. शेखर घुमे आणि मा. श्री. गुलाबराव लोणारे उपस्थित होते.

वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्रैमासिक ऊर्जा मैत्री बैठक नियमितपणे आयोजित करावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तालुका भद्रावतीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये