ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर प्रसिद्ध कवी डॉ.धनराज खानोरकरांचा ‘साहित्याचा समर्पित प्रवास’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :-  महाराष्ट्र शासनाच्या आणि रसिकांच्या पसंतीस उतरणाऱ्या दूरदर्शनच्या लोकप्रिय ‘सह्याद्री’ वाहिनीवरून शुक्रवार,आज दि. २३ ऑक्टो. २०२६ रोजी दु. १२:०० वा. एका विशेष कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. ‘हॅलो सह्याद्री’ या दर्जेदार कार्यक्रमांतर्गत ‘साहित्याचा समर्पित प्रवास’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.

      या विशेष कार्यक्रमात ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख,प्रसिद्ध कवी, लेखक,पत्रकार आणि स्तंभलेखक डॉ. धनराज खानोरकर हे प्रमुख सहभाग घेणार आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रेरणादायी साहित्य प्रवासावर आणि लेखकीय अनुभवांवर या मुलाखतीत प्रकाश टाकला जाणार आहे.

  कार्यक्रमाचे नेटके संचालन विवेक अलोणी (नागपूर) हे करणार असून, निर्मिती मीनल पाठराबे (नागपूर) यांनी केली आहे. साहित्य, कविता आणि लेखनाची आवड असणाऱ्या तमाम वाचकांसाठी व रसिकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत पर्वणी ठरणार आहे. तेव्हा,आज २३ ऑक्टो. २०२६ रोजी दु. १२:०० वा.व रात्रो ११.००वा.दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर हा विशेष कार्यक्रम आवर्जून पहावा,असे आवाहन नागपूर दूरदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये