
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत एका तरुणाला ९०७ ग्रॅम गांजासह अटक केली. या कारवाईत गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ रोजी गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाग मंदिर मागे, शिवाजी नगर, भद्रावती येथे छापा टाकण्यात आला. यावेळी सोनल दशरथ महाकुळकर (वय २०, रा. शिवाजी नगर, भद्रावती) याच्या ताब्यातून ९०७ ग्रॅम गांजा (किंमत १३ हजार रुपये) जप्त करण्यात आला. तसेच हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी (किंमत ६० हजार रुपये) व सॅमसंग कंपनीचा मोबाईल (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण १,०३,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५४/२०२६ अन्वये NDPS Act कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बावकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनी विरेंद्र केदारे, सपोनी संजीव मिश्रा, पोउपनि संतोष केदार, पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्टूनकर, गोपाल आतकुलवार, लंकेश नायडू, पोअं खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, मपोअं रागिणी रायपूरे आदींनी केली.



