ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दानातून माणुसकीचा उत्सव : महाजन परिवाराचा स्तुत्य उपक्रम

नवरात्रि निमित्य ३५० गरजु महिला, पुरुष व बालकांना वस्त्र भेट : आ. करण देवतळे यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे!”

दान म्हणजे केवळ एखादी वस्तू देणे नव्हे, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे आणि माणुसकीचे नाते अधिक घट्ट करण्याचे माध्यम होय. याच उदात्त भावनेचा प्रत्यय भद्रावती येथे महाजन परिवाराच्या वतीने आयोजित वस्त्रवितरण उपक्रमातून आला.

नवरात्रि उत्सवाचे औचित्य साधून महाजन परिवारातर्फे वस्त्रस्वरूपात भेट देण्याच्या उपक्रमाला आमदार करन देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल साडेतीनशे गरजू महिला, पुरुष आणि बालकांना वस्त्रभेट देण्यात आली. सणासुदीच्या काळात मिळालेल्या या अनमोल भेटीमुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते अनिल धानोरकर, स्व. श्रीनिवास शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक धनराज आस्वले, प्रशांत झाडे, बाबा आस्वले, भाजपचे इम्रान शेख तसेच महाजन परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्यामबाबू महाजन, सचिन महाजन, बंटी उर्फ गणेश महाजन, प्रवीण महाजन, सुना सौ. सोनाली, पूजा आणि गुंजन महाजन यांच्यासह परिवारातील नातवंडांची उपस्थिती होती.

“संपत्तीचे खरे वैभव तिच्या संचयात नसते, तर ती गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी उपयोगात आणण्यात असते,” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

महाजन परिवाराचा हा उपक्रम म्हणजे उत्सवाच्या आनंदात गरजूंचाही सहभाग वाढविणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी आदर्श आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये