घरजळीत विधवा महिलेला किशोर वडेट्टीवारांचा मदतीचा हात!
जोगापूर येथील सिंधुबाई गावडे यांच्या संसाराला दिला आधार ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ तालुक्यातील जोगापूर येथे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडे तसेच घरावरील फाटे जळून खाक झाल्याने उघड्यावर आलेल्या विधवा महिला सिंधुबाई बंडू गावडे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वडेट्टीवार यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे पीडित महिलेच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले, तर गावकऱ्यांनीही या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.
जोगापूर येथील सिंधुबाई बंडू गावडे यांच्या घराला १२ ऑक्टोबर रोजी अचानक आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि घरावरील फाटे जळून खाक झाले. त्यामुळे या विधवा महिलेवर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर वडेट्टीवार यांनी तत्परता दाखवत गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जोगापूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घरजळीत पीडिता सिंधुबाई गावडे यांना आर्थिक मदत देऊन संकटाच्या काळात त्यांना आधार दिला.
घरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाल्याने सिंधुबाई गावडे यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला. पीडित महिलेच्या दुःखात सहभागी होत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल गावकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर, कमलेश निमगडे, महेंद्र कुणघाडकर, विपिन पेदूलवार, राजेश डोंगरे, सारनाथ बक्षी, पुष्पा पेंदोर, विमल कतलाम, हर्ष महेशकर, दिलीप चापले यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



