ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

वसतीगृहातील प्रवेश रद्द केल्याने पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ सिंदेवाही येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहातून तीन विद्यार्थ्यांचा प्रवेश कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, यासाठी हताश झालेल्या पालकांनी थेट चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्याय मागितला आहे.

पत्र परिषदेत पिीडि पालकानी सागितले की, सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथील आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात राहणारे वेदांत दिवाकर उईके (इ. १२ वी), नाविन्य अरुण सलामे (इ. १२ वी) आणि युसुफ सिकंदर मेश्राम (इ. १२ वी) या तीन विद्यार्थ्यांचा एका विशिष्ट प्रतिबंधक कायद्यान्वये वस्तीगृहातील प्रवेश कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहेया कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत हवालदिल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विनंती अर्जात पालकांनी आपली व्यथा मांडली आहे. “आम्ही सर्व जण भूमीहीन मजूर असून आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुलांना शहरात भाड्याची खोली करून देणे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे आमच्या आवाक्याबाहेर आहे,” असे पालकांनी अर्जात नमूद केले आहे.

वस्तीगृहातून काढून टाकल्यास मुलांचे शिक्षण मध्यातच सुटेल आणि ते शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी द्यावी आणि त्यांचा वस्तीगृहातील प्रवेश रद्द करू नये, अशी आर्त विनंती पालकांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशी कोणतीही चूक किंवा गैरवर्तन घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहील, असे लेखी आश्वासनही पालकांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.पत्र परिषदेला दिवाकर उईके (रा. पांढरवाणी), अरुण सलामे (रा. वासरा) आणि सिकंदर मेश्राम (रा. पांढरवाणी) उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये