स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालयात “बाल संसद” कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय, गोंडपिपरी येथे शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘बाल संसद – बालकांचे हक्क व अधिकार’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रशिक्षक अर्जुन अलगमकर (सेवानिवृत्त, ICA, भारत-अमेरिका) यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व अधिकार, बालकांचे संरक्षण, त्यांचे सामाजिक स्थान तसेच लोकशाही प्रक्रियेत बालकांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, कर्तव्यांची जाणीव करून देणे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणे, हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरलेल्या या कार्यशाळेमुळे त्यांना बालकांचे हक्क व अधिकार यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सदर कार्यशाळेस प्राचार्य प्रदीप बामनकार, प्रा. गौरी बाटवे, प्रा.रत्नमाला निमगडे प्रा.नामदेव बावणे, प्रा.रमेश हुलके प्रा.पत्रुजी सातघरे उपस्थित होते.



