ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आर्वी येथे प्रेमसंबंधातून वाद

२१ वर्षीय तरुणाची हत्या, तिघे आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आर्वी येथील वाल्मिकी वॉर्ड परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान तरुणाच्या हत्येत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अभिजीत अवधूत ढोकणे (वय २१, रा. पिंपळा पुनर्वसन, ता. आर्वी) याची आई नेहा अवधूत ढोकणे (वय २३) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ सुभाष देवबाआप्पा (वय ५२) याचे मृताच्या आईसोबत मागील दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच कारणावरून आरोपी आणि मृत अभिजीत यांच्यात वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान वाल्मिकी वॉर्ड, आर्वी येथे अभिजीत ओट्यावर बसलेला असताना आरोपींनी संगनमत करून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले, तसेच लोखंडी पाइपने डोक्यावर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात अभिजीतचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी प्रथमेश सुभाष हायगले (वय २२), विशाल अरुण निपाणे (वय २५) आणि सुभाष देवबाआप्पा (वय ५२) यांच्याविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ०८३९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दाखल अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक महेश राठोड, पोलीस स्टेशन आर्वी.

तपास अधिकारी: सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी तळीकोटे, पोलीस स्टेशन आर्वी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये