ब्रह्मपुरीत रंगली बुध्द – भीमगीतांची संगीतमय प्रबोधनात्मक रजनी : भीमसैनिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात टी सिरीज इंडियन आयडॉल फेम राॅक स्टार,मुंबई येथील शिवा मोहोड आणि ग्रुप यांचा येथील भीमसैनिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात बुध्द – भीमगीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम रंगला.अनेक प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण भारुन गेले होते.घोषणांच्या निनादात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सुरेल गीतांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.समिती अध्यक्ष अशोक रामटेकेंनी संगीत ग्रुपचे स्वागत करुन या कार्यक्रमाची भूमिका व महत्त्व विशद केले.
या संगीत प्रबोधनात्मक कार्यक्रमात गायक शिवा मोहोडसोबत वंदन राऊत, मिताली,अनिकेत,श्रेयस, राकेश,दीपक,नितीन अंकित,डेविड या ग्रुपने रसिकांची मने जिंकली. निवेदक साहिल दरणेंनी कार्यक्रम रंगविला.समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष सुधीर अलोणे, सचिव डॉ युवराज मेश्राम, सहसचिव राजहंस गायकवाड, कोषाध्यक्ष के.जी. खोब्रागडे, संघटक नेताजी मेश्राम,महिला संघटक छायाताई जांभूळे व सदस्य आसाराम बोदेले,दादा मेश्राम,नागेश फुले, मिलिंद निमगडे,अँड सुभाष मेश्राम,जगदिश मेश्राम, महेंद्र रामटेके, प्रा चंद्रशेखर बांबोळे, सिद्धार्थ मेश्राम यांनी सदर कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. पंचकोशितल्या रसिकांनी गर्दी करुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



