अखेर महिनाभरापासून दहशत निर्माण करणारा नरभक्षी वाघ जेरबंद
सावली वनविभागाला अखेर यश ; महिनाभरानंतर वनविभाग घेतला सुटकेच श्वास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रांतर्गत मौजा सामदा, निलसनी, पेडगाव, सोनापूर व वाघोली-बुटी परिसरात मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या आणि मानवांवर हल्ले करणाऱ्या T-122 या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.
सदर वाघाने मागील महिनाभरात गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या तीन गुराख्यांचा बळी घेतल्याने सामदा परिसरासह लगतच्या गावांमध्ये शेतकरी, गुराखी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने सदर वाघास जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती.
ही मोहीम दि. २७ सप्टेंबर २०२७ पासून सुरू असून T-122 या वाघास जेरबंद करण्यास वनविभागाकडून विविध प्रकारचे हुन्नर लढविल्या जात होते. 30 × 30 मीटर आकाराचा पिंजरा लावून वाघ पकडण्यासाठी सावली वनविभागामार्फत ह्या पिंजऱ्याचा पहिलाच प्रयोग होता.
सदरची मोहीम रामानुजम, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर तसेच राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर आणि विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
या मोहिमेत मुकेश भांदककर मानद वन्यजीवरक्षक चंद्रपूर, घनश्याम नायगमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर अक्षय नारनवरे, जीवशास्त्रज्ञ, चंद्रपूर, डॉ. छोनकर सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग मुल मारुती पुल्लेवाड क्षेत्र सहाय्यक,व्याहाड, प्रदीप कोडापे (शूटर), शेडमाके, वनरक्षक, सामदा, डांगे, वनरक्षक, उपरी खुडे, वनरक्षक, नवेगाव; अक्षय मेश्राम, वनरक्षक, गायडोंगरी, नंदकिशोर चणकापुरे वनरक्षक सिरसी,लंकेश आखाडे, वनरक्षक, चारगाव, सतीश नागोसे, चितेगाव,श्रीराम आदे राजोली ,नीलेश बोरकर गोलाबुज,तसेच STPF पथक, मूल, RRU पथक, चंद्रपूर, वनमजूर व PRT चमू यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या संयुक्त कार्यवाही निश्चितच यश मिळविण्याचा विश्वास होता . सदरच्या मोहिमेकरिता 9 सीसीटीवी गरुडा कॅमेरे, 20 ट्रॅप कॅमेरे, 3 लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले असून 50 ते 60 वनकर्मचारी व वनमजूर 24 तास वनविभाग सदर वाघावर पाळत ठेऊन होते. वरील वाघाचे वय 6वर्ष असून अखेर नरभक्षी वाघ जेरबंद झाल्याने वनविभाग यांनी घेतला सुटकेच श्वास.
*विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली*



