ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांगत्वावर मात करत बजावले मतदानाचे कर्तव्य.!

इंदिरा उरकुडे यांचा जिद्दीला सलाम ; दिव्यांग शिक्षिकेच्या मतदानाने दिला लोकशाहीला माणुसकीचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ लोकशाहीत मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावताना अडचणींचे कारण पुढे न करता आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिव्यांग शिक्षिका इंदिरा विठ्ठल उरकुडे यांनी सर्वांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला.

 गोंडपिपरी तालुक्यातील मूळ गाव तारसा येथील इंदिरा विठ्ठल उरकुडे या भंगाराम तळोधी येथील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पदवीधर मतदार म्हणून शुक्रवार, दि. २३ रोजी गोंडपिपरी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांगत्वामुळे येणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करत त्यांनी लोकशाहीच्या प्रक्रियेत आपले योगदान दिले.

मतदान केंद्रावर पोहोचलेल्या इंदिराताईंना मतदानासाठी पुढे जाताना पोलिस आणि महसूल कर्मचाऱ्यांनी आधार दिला. त्यांच्या या सहकार्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्याच्या प्रक्रियेत माणुसकीचे दर्शन घडले. एका मतासाठी घेतलेला हा प्रयत्न अनेकांना विचार करायला लावणारा आहे. मतदानाच्या दिवशी किरकोळ कारणांनी मतदान टाळणाऱ्यांसाठी इंदिराताईंची जिद्द हा आत्मपरीक्षणाचा संदेश आहे.

 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि लोकशाहीवरील विश्वास किती महत्त्वाचा असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. इंदिरा उरकुडे यांची ही कृती केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती जिद्द, स्वाभिमान आणि नागरिक कर्तव्याची प्रेरणादायी कहाणी ठरते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये