ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे फार अवघड : सभापती विष्णू झोरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरात बुलढाणा येथील राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेची शाखा असून या शाखेचा सहावा वर्धापन दिन शाखेत छोटे खाणी समारंभ घेऊन साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक संचालक तथा नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती विष्णू झोरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की बँकिंग क्षेत्रात सगळीकडे स्पर्धा झाल्याचे पहावयास मिळत आहे अनेक वित्तीय संस्था या ग्राहकांना ठेवीवर आकर्षक व्याज देत आहे तर काही वित्तीय संस्थांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करेपर्यंत त्यांना ठेवीवर अधिक व्याजाचे प्रलोभने देऊन संस्था बंद करून पोबारा केल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत राजर्षी शाहू या संस्थेने अगदी कमी वेळात ग्राहकांचा विश्वास संपादन करून कोणत्याही ग्राहकांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली आहे त्यामुळेच महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर या संस्थेने आपले नेटवर्क वाढविले आहे स्पर्धेच्या युगात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे फार अवघड झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके हे संस्था कशी वाढेल.

यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात यावेळी प्रदीप शेळके रामचंद्र पिंपळे,श्रीधर मांटे,सुरजमल ढाकणे, गजानन सांगळे, भगवान खरात, विष्णू बुलबुले, संतोष डोईफोडे, सदानंद वाघ संस्थेचे विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले शाखा व्यवस्थापक कैलास बनसोडे, आकाश लखवाल, प्रवीण शिराळ, सोनू भोपळे, योगेश गव्हाळे हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये