ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस दलाच्या ताफ्यात ४ नवीन ‘SLM मिनी’ वाहने दाखल

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते झाले लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि पोलीस दलाची गतिशीलता वाढवण्यासाठी वर्धा पोलीस दलाच्या ताफ्यात आज नवीन SLM मिनी वाहनांचा समावेश करण्यात आला. या नवीन वाहनांचे लोकार्पण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात अयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस दलाचे कार्य अधिक प्रभावी व्हावे आणि दुर्गम भागातील गस्त तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी जलद प्रतिसाद मिळावा या उद्देशाने ही नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी वाहनांचे पूजन करून आणि हिरवी झेंडी दाखवून ही वाहने अधिकृतपणे पोलीस सेवेत दाखल करण्यात आली.

वाहनांची उपयुक्तता :

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आधुनिक काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडे अद्यावत साधने असणे आवश्यक आहे. ही नवीन वाहने चारही बाजूने अत्याधुनिक cctv कैमेरे युक्त असून वर्धा जिल्ह्याच्या विविध भागांत गस्त घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था गर्दीवर नियंत्रण, चंदोबस्त निगराणी करण्याकरिता व गुन्हेगारांचे कृत्यास आळा घालण्याकरीता अत्यंत उपयुक्त ठरतील.

उपस्थित मान्यवर :

या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कमार अग्रवाल यांच्यासह, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे, पोलीस उपअधीक्षक गृह, श्री. पंडलीक भटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, आवाँ श्री. चंद्रशेखर ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री सुशील कुमार नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्रीमती वंदना कारखेले, पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) श्री. विनोद चौधरी, मोटार परिवहन अधिकारी, वर्धा (MTO) श्री. देवानंद पाटील तसेच या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये