ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

चुलत दिरानेच आपल्या वहिनीची गळा दाबून केली हत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा तालुक्यातील चेक खापरी येथे नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.चुलत दिरानेच आपल्या वहिनीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली असून सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना प्रेमसंबंधाच्या संशयातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.संजना रुपेश सोनटक्के वय (३२) रा.चेक खापरी असे मृत महिलेचे नाव आहे.तर धनराज यादव सोनटक्के वय (३६) रा.चेक खापरी असे आरोपीचे नाव आहे.

मृत महिलेचे पाच वर्षापासून चुलत दिर धनराज सोनटक्के याचेसोबत प्रेमसंबंध होते.मात्र आरोपी दिराला आपल्या व्यतिरिक्त तीसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.आरोपीने रविवारी (दि.२२)रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मृतक संजनाला घराजवळच असलेल्या विकास पिद्दुरकर यांच्या शेतात बोलवून वाद घातला.व संतापाच्या भरात आरोपीने वहिनीचा गळा दाबून खून करून तो घटनास्थळावरून पसार झाला.सोमवारला (दि.२३)दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतमालकाला शेतात संजनाचा मृतदेह दिसल्याने घटना उघडकीस आली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संबंधित आरोपीला सहा तासात जेरबंद केले.आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाचा पिसीआर दिला.पुढील तपास ठाणेदार राहुल ठेंगणे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये